Friday, November 5, 2010

दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आपल्या जीवनाला आनंद देईल.



दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. हा प्रकाशाचा उत्सव साजरा करताना आपण काळोख्या रात्रीला तेजोरत्नांच्या अलंकारांनी सजवतो, नटवितो, शोभायमान करतो. सर्व प्रकारचे अंधार मागे टाकून उज्ज्वल प्रकाशाच्या दिशेने आपले प्रत्येक पाऊल पुढे पडावे, अशी मनोमन इच्छा बाळगून आपण दिवाळीचे स्वागत करूया असे ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी महान्यूजशी बोलतांना सांगितले.

प्रश्न- दिवाळी या सणाची परंपरा आणि सांस्कृतिक वारसा काय आहे? 
उत्तर- आपण फार मोठी परंपरा आणि मोलाचा सांस्कृतिक वारसा असलेल्या भारत देशाचे नागरिक आहोत.
आपण तेजाचे उपासक आहोत. शतकानुशतके आपण प्रकाशमार्गावरचे पथिक आहोत. सर्व प्रकारचे अंधार मागे टाकून उज्ज्वल प्रकाशाच्या दिशेने आपले प्रत्येक पाऊल पुढे पडावे, अशी मनोमन इच्छा बाळगणारे आहोत. 
आपली दिवाळी पाच दिवसांची असते. पहिल्या दिवशी धनत्रयोदशीला यमराजाच्या नावाने दक्षिणेकडे दिवा लावून आणि आरोग्याकरिता धन्वंतरीची जयंती साजरी करुन आपण या सणाचा शुभारंभ करतो.हे खरेच आहे. आयुष्याचा उपभोग व्यवस्थित घ्यायचा असेल, दारिद्य, चिंता, अस्वस्थता अशा गोष्टींचा काळोख दूर करावयाचा असेल, तर आधी प्रकृती चांगली असली पाहिजे, पुरेसे आयुष्य लाभले पाहिजे.

दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपण आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी प्रत्यक्ष यमराजा आणि देवांचे वैद्य धन्वंतरी यांचे स्मरण करतो. दुसर्‍या दिवशी नरकचतुर्दशीच्या प्रभाती भगवान श्रीकृष्णाचा एक महान पराक्रम आपण आठवतो. नरकासुराचा वध करुन अमंगल, अशुचि प्रवृत्तीच्या दुष्टदुर्जनांचे निर्दालन करण्याचा संकल्पच आपण एक प्रकारे मनोमन सोडतो.

त्यानंतर लक्ष्मीपूजनाचा दिवस. चिरकाल अर्थसंपन्नता लाभावी, लक्ष्मीची कृपा आपल्यावर निरंतर राहावी म्हण्नू आपण लक्ष्मीचे पूजन करतो, प्रार्थना करतो. बलिप्रतिपदेच्या दिवशी नव्या वर्षाचा शुभारंभ करीत असताना ज्याला शेतकर्‍यांचा राजा म्हणून गौरविले आहे त्या बळीराजाचा बलिप्रतिपदा हा उत्सवदिन आपण मानतो. व्यापार, उद्योग यांचे नवे वर्ष त्या दिवसापूसन सुरु होते. आदल्या दिवशी लक्ष्मीपूजन केल्यानंतर दुसर्‍या दिवशी व्यापारे वसते लक्ष्मी । हे वचन सार्थ करण्यासाठी लक्ष्मीपूजनानंतर लगेचच लक्ष्मीने व्यापारात यश द्यावे म्हणून आपण व्यापाराच्या नव्या वर्षाचे नवे पर्व सुरु करतो. 

बलिप्रतिपदेच्या नंतर येणारा पुढचा दिवस म्हणजे भाऊबीज. दिवाळीच्या प्रारंभी धनत्रयोदशीला यमराजाच्य नावाने दिवे लावून आपण यमराजाचे एक प्रकारे स्वरण केले. आपण भाऊबीजेला यमव्दितीया असे म्हणतो. कारण यम आपल्या बहिणीकडे या दिवशी भोजनास गेला अशी श्रद्धा आहे. या दिवशी बहीण असलेल्या कोणाही भावाने आपल्या घरी भोजन न करता बहिणीच्या घरी जाऊन भोजन करावे, अशी परंपरा आहे. म्हणजे दिवाळीच्या प्रत्येक दिवशी आरोग्य, पराक्रम, धनसंपदेची उपासना, व्यापार, उद्योग आणि भाऊ-बहिणीच्या गोड पारिवारिक नात्याचा मधुर संगम असे पाच दिवस आपण दिवाळी साजरी करतो.

प्रश्न- दिवाळी हा सण एîक्याचा सण आहे यामध्ये धार्मिक आचारणाला किती महत्त्व आहे का? 
उत्तर दिवाळीत धार्मिक आचारणाला महत्त्व तसे कमी असले, तरी धार्मिक श्रद्धेचा पाया आरोग्याच्या, धन-स्वास्थ्याच्या, व्यापार-उद्योगाच्या आणि कुटुंब स्वास्थ्याच्या दृष्टीने मजबूत होण्यासाठी दिवाळीच्या सणातील प्रत्येक गोष्ट ही जणूकाही आखून ठरवून दिली आहे. या सर्व उत्सवामध्ये अधिक महत्त्व आहे ते दिव्यांच्या रोषणाईला, दिव्यांच्या सजावटीला, दिपांच्या मालिकांना, दीपावलीला. म्हणून या सणाला आपण दिवाळी च म्हणतो.

दीपमाला उजळवून, दिव्याच्या आरास करुन, अंधार दूर सारण्याचा सामूहिक प्रयत्न म्हणजे दिवाळी, दिवाळी हा चिंता - विवंचनांची जळमटे झाडून टाकून उमलत्या आनंदाचे आकाशदिवे आकांक्षांच्या आकाशात झगमगत ठेवणारा सण आहे. विक्रम संवताचे नवे वर्ष सुरु होताना सर्व आसमंत तेजाने उजळून टाकणारा, दाहीदिशांतून दरवळणार्‍या सुंगधाने मनामनात प्रसन्नतेची कारंजी फुलविणारा सण आहे. फराळांच्या गोड पदार्थांनी गोड झालेल्या तोंडाने परस्परांना गोड गोड शुभेच्छा देण्याघेण्याचा हा आणि यासारखा हाच सण आहे. 

प्रश्न- दिवाळी सण मोठा नाही आनंदा तोटा असे असले तरी पर्यावरणसंवर्धनासाठी हा सण कसा पूरक आहे? 
उत्तर- प्रचंड प्रमाणात वाढलेली लोकसंख्या, प्रदूषण, प्लॉस्टिकसारख्या पर्यावरणाला अडचणीत टाकणार्‍या उत्पादनांची गर्दी अशा अनेकविध कारणांमुळे सध्या जागोजागी स्वच्छता मोहिमा उघडल्या जातात. आपले शरीर स्वच्छ ठेवा, आपली कॉलनी स्वच्छ ठेवा, अशा स्वरुपाच्या प्रचारमोहिमा वारंवार राबविल्या जातात. 

तथापि, असे कोणी माहिमेतून न सांगताच आपण परंपरेने दिवाळीपूर्वी एक स्वच्छता मोहीम घराघरातून हाती घेत असतो. गृहिणी मोठय़ा उत्साहात घरातील केरकचरा काढण्याच्या आणि साफसफाईच्या कामाला लागलेल्या दिसतात. परंपरेचे महत्त्व आहे ते इथेच. सफाई आणि स्वच्छता करा, असे फलक लावावे लागत नाहीत. दसरा झाला की, प्रत्येक दक्ष गृहिणी या साफसफाईचे वेध लागतात. ही साफसफाई का केली जाते ? 

दिवाळीत लक्ष्मी आपल्या घरी येणार आहे, त्या वेळी सगळे घर कसे लखलखीत स्वच्छ असावे, त्यामध्ये देवीने आपल्या भक्तांना , मी तुमच्या गावी यायला तयार आहे. पण गाव सर्व स्वच्छ झाले पाहिजे, गावात कुठेही केरकचरा आढळता नये, असे सांगितले असल्याचे संदर्भ सापडतात. आपल्याकडे स्वच्छतेचे महत्त्व पूर्वीपासून जाणले गेले आहे. स्वच्छता म्हणजे मनाची आणि शरीराचीसुद्धा.

प्रश्न- सामाजिक आनंदाची उधळण करणारा हा सण काय संदेश देतो? 
उत्तर- दिवाळीत कौटुंबिक आणि सामाजिक आनंदाची देवाणघेवाण करुन आपण एकमेकांबद्दल मनात असेलेली किल्मिषे, दुजाभाव दूर करुन मने स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो, निदान तो केला जावा, अशी अपेक्षा असते आणि शरीर स्वच्छ करण्यासाठी या दीपावलीच्या मंगल दिवसांत रोज अभ्यंगस्नान परंपरेने सांगितले आहे. दिवाळीपासून थंडी विशेष प्रमाणात वाढू लागते. म्हण्नू अंगाला तेल लावून केलेले स्नान आपली त्वचा थंडीमुळे शुष्क होऊ देत नाही. यासाठी दिवाळीत तेलाने अंगमर्दन करुन नंतर उटणे लावून गरम पाण्याने स्नान करण्याची परंपरा आहे. 

आपल्याकडे स्नानाला विशेष महत्त्व आहे. इतर अनेक धर्मात आणि धर्मग्रंथतत ते ते कधी आठवडय़ातून एकदा स्नान, तर कधी नुसतेच कोपरापर्यंत हात आणि पाय धुणे, तर कधी थंडीमुळे स्नानाला फाटा देऊन नुसते अंग पुसून घेणे, असे विविध आचार रुढ झाले. मात्र आपल्याकडे आंघोळीसाठी पुरेसे पाणी सगळीकडे नसले तरी बर्‍याच जागी उपलब्ध होते. मुळात आपल्या पूर्वजांनी वस्ती केली ती नदीच्या व जलाशयाच्या काठावरच. माघस्नान, कार्तिकस्नान अशा विविध प्रकारच्या स्नानपरंपरा आपल्याकडे आहेत. ही स्नानपरंपरा नदीवर जाऊन आंघोळ करणे उत्तम, विहिरीतील पाणी आणून केली जाणारी आंघोळ त्यापेक्षा कमी दर्जाची, तर घरात साठविलेल्या पाण्याची आंघोळ ही आणखी कमी दर्जाची. अशा स्वरुपाची फले याबाबतीत सांगितलेली आहेत. त्यामागे हेतू काय ? प्रत्येकाने आंघोळ व्यवस्थित करावी. नदीवरची आंघोळ सर्वात चांगल्या प्रकारे होऊ शकते, असा त्यामागे विचार असावा.

एक गोष्ट निश्चित, दीपावली सणाच्या निमित्ताने स्वच्छतेचे, शुद्धतेचे महत्त्व अखिल समाजाच्या मनावर बिंबवणे, असा प्रयत्न आपल्या संस्कृतिने केला आणि तो शेकडो नव्हे, हजारो वर्षे टिकवून धरला. ही स्वच्छता केवळ हिंदूनीच करावी असे नव्हे. हिंदू धर्मातील एखादा चांगला आचार सर्वांनीच अनुसरला तर त्यात काही बिघडत नाही. हिंदू धर्मातील आचार आपण इतरांना सांगितले तर तो मोठा गुन्हा होईल, अशी समजूत बाळगण्याचे कारण नाही. दीपावलीतील लक्ष्मीपूजन सर्व धर्माचे लोक आपापल्यापरीने साजरे करतात. मग स्वच्छतेच्या मोहिमा आखणार्‍यांनी दीपावलीच्या सणाच्या मागचे हे स्वच्छतेचे आणि साफसफाईचे तत्त्व ध्यानी घेऊन पावसाळ्यानंतर दिवाळीनिमित्त सर्वत्र शहरे, रस्ते, गल्ल्या साफसूफ केल्या तर ते चांगले होईल. यंदा जमले नाही तर पुढल्या वर्षी. आणि अर्थातच जुन्या समजुतीप्रमाणे संपन्नतेची देवी अशा ठिकाणी निश्चितच वास्तव्याला येईल, यात काय संशय ? 
आपल्या प्रकाशाने सारा अंधार मिटवून प्रकाशाकडे म्हणजे सुख-समृध्दीकडे नेणारा हा सण उजळणार्‍या दिव्याप्रमाणेच लेखानीचा प्रकाश अन्याय अज्ञानाचा अंधकार दूर करतो. त्याप्रमाणेच आपल्या सर्वांच्या जीवनातही दिवाळी फुलवेलं प्रकाश सौख्याचा ! शुभेच्छा !!!...

'महान्यूज'मधील मजकूर 

Saturday, October 30, 2010

एका वैचारिक क्रांतीचा प्रवास : नैसर्गिक धर्मशास्त्र ते नैसर्गिक निवड

चार्ल्स डार्विन यांच्या १९ व्या शतकातील उत्क्रांतीविषयक सिद्धांतांनी सर्व प्रस्थापित विचारांना आणि सत्ताधारी वर्गानाही प्रचंड धक्का दिला. या सत्ताधारी वर्गात सर्वात प्रमुख प्रवाह होता तो धर्मपीठांचा. विज्ञानविश्वात तोपर्यंत फिजिक्स झपाटय़ाने प्रगत होत होते. परंतु जीवसृष्टीचा अभ्यास करून उत्क्रांतीविषयक सिद्धांताने फिजिक्सने आखून दिलेल्या सीमाही ओलांडल्या. तेव्हापासून आयझ्ॉक न्यूटननंतर चार्ल्स डार्विन यांचे नाव क्रांतिकारक वैज्ञानिक म्हणून घेतले जाऊ लागले. डार्विन यांचे एक स्वतंत्र आणि समांतर विचारपीठच निर्माण झाले. जवळजवळ शंभर वर्षे या डार्विन पीठाचा दबदबा इतक्या प्रचंड प्रमाणात होता की त्याला आव्हान देणारे प्रतिगामी व सनातनी म्हणून संबोधले गेले. परंतु गेल्या काही वर्षांत विश्वाच्या उत्पत्तीविषयी, जीवसृष्टीच्या निर्मितीविषयी आणि उत्क्रांतीविषयी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात नवे सिद्धांत निर्माण होऊ लागले. या पाश्र्वभूमीवर माजी खासदार प्रदीप रावत यांनी भाषांतरित केलेला कॅलिफोर्निया विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ इकॉलॉजी अ‍ॅण्ड इव्होल्यूशनरी बायॉलॉजीचे प्रा. फ्रान्सिस्को जे. आयला यांच्या विवेचनाचा हा स्वैर अनुवाद...

Sunday, October 10, 2010

युथफूल महासंस्कृती-६ : माय मराठीला लाभणार ग्लोबल चेहरा

राज्य शासनाचे मंत्री, प्रशासकीय प्रमुख, तसेच विभागप्रमुख, इ. मान्यवरांनी शासकीय, सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना शक्यतो मराठी भाषेत बोलावे, अशी अपेक्षा ठेवण्यात येईल. अमराठी, विशेषत: परदेशातील प्रतिनिधी यांच्या समवेत होणाऱ्या अधिकृत बैठका, कार्यक्रम यांमध्ये संवाद साधताना मराठीचे भाषांतर करण्यासाठी दुभाषाची, अनुवादकाची मदत घेण्यात येईल. त्यामुळे मराठीचे महत्त्वाचे स्थान अधोरेखित होईल, मराठी भाषकांचे अनुवादकौशल्य विकसित करण्यासाठी चालना मिळेल आणि मराठी भाषकांना अनुवादक म्हणून व्यवसायही प्राप्त होईल.

उद्योजक व्हा!

परंपरागत व्यवसायाच्या क्षेत्रामधील संधींच्या अभावामुळे अनेक तरुणांना स्वत:चे उद्योग निर्माण करून उपजीविकेचे साधन निर्माण करावे लागले आहे. ज्यांना नोकरीधंदा मिळू शकला नाही ते आपल्या स्वत:च्या कौशल्याचा व कसबाचा उपयोग करून नवीन रोजगार निर्माण करीत आहेत. याव्यतिरिक्त अनेक तरुण चांगली नोकरी सोडून स्वत:चे व्यवसाय सुरू करीत आहेत आणि हे क्षेत्र आज झपाटय़ाने विस्तारित होत आहे. दीर्घकाळामध्ये होणारे मोठे लाभ व आपली उद्दिष्टे ठरविण्याचे स्वातंत्र्य ही यामागची दोन प्रमुख मार्गदर्शक तत्त्वे आहेत.

Thursday, October 7, 2010

आद्यशक्तीपीठ आई तुळजाभवानी !


तुळजापूर येथे नवरात्रानिमित्त विविध उत्सव आणि कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या उत्सवास भक्तांची प्रचंड गर्दी असते. तुळजापूर शक्तीपीठाचा इतिहास आणि उत्सवाची माहिती जाणून घेणे प्रत्येकालाच आवडेल. या लेखात थोडक्यात त्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच राज्य शासन या तीर्थक्षेत्र विकासासाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहितीही यात आहे.

तुळजापूरचे नाव ऐकलेले नाही, असा मराठी माणूस सापडणार नाही. खरे म्हणजे शेजारच्या आंध्र व कर्नाटकातही तुळजाभवानीचे हजारो भक्त आणि भाविक आहेत आणि ते नित्यनियमाने तुळजापुरात येत असतात. तथापि तुळजापुराशी मराठी मनाचे नाते काही विशेष असेच आहे.

इतिहास संशोधक रा.चिं. ढेरे यांनी श्री तुळजाभवानी या शीर्षकाचा एक ग्रंथ लिहिला असून त्यात तुळजापूर क्षेत्राची परंपरा एक हजार वर्षांहून जुनी असल्याचे नमूद केले आहे. श्रीक्षेत्र तुळजापूर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. ते आद्यपीठ आहे. सोलापूर-औरंगाबाद महामार्गावर बालाघाटच्या डोंगरात तुळजापूर वसलेले आहे. सोलापूर-तुळजापूर हे अंतर सुमारे ४५ कि.मी. तर उस्मानाबाद-तुळजापूर हे अंतर सुमारे २० कि.मी. एवढे आहे.

तुळजापूरचे प्रसिध्द मंदिर एखाद्या भूईकोट किल्ल्यासारखे आहे. ते पूर्वाभिमुख आहे. गर्भगृह, गूढ मंडप आणि सोळा खांबी मंडपाच्या धर्तीवर बांधलेला सभा मंडप अशी विस्तीर्ण प्रकारातील भवानी मंदिराची रचना आहे. आतून अनेक ओवर्‍या बांधल्या असून मुख्य मंदिरातील भवानी ही अष्टभूजा महिषमर्दिनीच्या रुपात आहे. तिच्या हातात त्रिशूळ, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि महिषासुराची शिखा धारण केलेली आहे. पाठीवर बाणाचा भाता आहे. डावा पाय भूमीवर टेकलेला असून उजवा पाय महिषासुराच्या शरीरावर दाबलेला आहे. दोन्ही पायांच्या मध्यभागी महिषासुराचे शीर पडलेले आहे. देवीच्या मुखाच्या उजव्या-डाव्या बाजूंना चिरंतनाची प्रतिके असलेले चंद्र-सूर्य कोरलेले आहेत. महिषासुराच्या धडाच्या उजवीकडे सिंह हे भवानीचे वाहन आहे.

भवानी मंदिराच्या आवारात कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ आणि अमृतकुंड आहे. मंदिराबाहेर तुळजापुरात पापनाशी, मंकावती, नागझरी अशी तीर्थे आहेत. तुळजापुरात विविध मठही आहेत.

आपल्याकडील परंपरेत एकदा प्रतिष्ठापित झालेली मूर्ती सहसा हलविण्यात येत नाही. मात्र तुळजाभवानीची मूर्ती वर्षातून तीन वेळा हलविण्याची प्रथा आजही आहे. भाद्रपद वद्य नवमी ते अश्विनी शुध्द प्रतिपदेच्या पहाटेपर्यंत तुळजाभवानीची मूर्ती शेज घरात असते. त्यानंतर देवीचा शारदीय नवरात्र उत्सव सुरु होतो. नवरात्रात सीमोल्लंघनानंतर अश्विन शुध्द दशमी ते अश्विन पोर्णिमेच्या पहाटेपर्यंत मूर्ती अहमदनगर जिल्ह्यातील भिंगारहून आलेल्या पलंगावर निद्रिस्त असते. याशिवाय पौष अमावस्येपासून पौष शुध्द अष्टमीच्या पहाटेपर्यंत देवी शेज घरात निद्रिस्त असते. त्यानंतर शाकंभरी नवरात्र सुरु होते.

तुळजाभवानी मंदिरास अनेक राजे-राजवाडय़ांनी योगदान दिले आहे. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली सोन्याच्या मोहरांची माळ आजही देवीच्या गळ्यात असते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी भक्तांसाठी विहीर खोदून दिली. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेत तुळजापूरचे मंदिर, तेथील तुळजाभवानी, भवानीचा पराक्रम, भवानीने पराक्रमासाठी इतरांना दिलेली प्रेरणा अशा बाबींचे उल्लेख होतात. मराठी साहित्यातही याबाबी विविध पोवाडय़ांतून तसेच काव्यातून दिसून येतात. तुळजाभवानी ही साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थान राहिली आहे. समर्थ रामदासांच्या रचनांतूनही तुळजाभवानीचा महिमा वर्णन करण्यात आलेला आहे.

दरवर्षी अक्षरश: शेकडो भाविक तुळजापुरात येतात. मंदिरापर्यंत पायी चालत येणारे कितीतरी भाविक आहेत. विशेषत: अश्विनी पौर्णिमेला पायी येणार्‍या भाविकांची उदंड गर्दी होते. त्यांच्या सोयीसाठी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला सोलापूर-तुळजापूर व उस्मानाबाद-तुळजापूर रस्ता वाहनांसाठी बंद करण्याची वेळ येते.

अशा या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाने स्वतंत्र प्राधिकरण स्थापन केले असून त्यामार्फत मंदिर तसेच शहर विकासाची विविध कामे हाती घेतली जात आहेत. या कामांवर राज्याचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव विशेष लक्ष ठेवून आहेत. त्यांनी प्राधिकरणाच्या कामांचा वेळोवेळी आढावा घेतला आहे. राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष मधुकरराव चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, उपविभागीय अधिकारी सुनील यादव आदींनी प्राधिकरणाच्या कामाला गती देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

तुळजापुरात येणार्‍या भाविकांच्या सुविधेसाठी आता पाच मजली दर्शनमंडप बांधून तयार आहे. या दर्शन मंडपात एकावेळी सुमारे दहा हजार भाविक रांगेत राहू शकतील. त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी व अन्य सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

'महान्यूज'मधील मजकूर.

नवरात्र उत्सवास प्रारंभ..


शारदीय नवरात्राचा प्रारंभ होत आहे. घटस्थापना असे या दिवसाचे महत्त्व संस्कृत भाषेत सांगता येईल आणि आजपासून घट बसणार आहेत, असे मराठीत म्हणता येईल.

महाराष्ट्र शारदेच्या मंदिरात श्रीज्ञानेश्वरमाऊलींनी अध्यात्मगंगेच्या अमृतजलाचे घट सातशे वर्षापूर्वीच बसविले. शासदीय नवरात्रात ज्ञानेश्वरमाऊलींनी अठरा अध्यायाचे अठरा घट बसविले. ज्ञानेश्वरांचे समकालीन नामदेव महाराज यांनी ज्ञानदीप लावू जगी असे म्हणत कीर्तनाचे रंगी नाचत भावभक्तीचा अखंड नंदादीप महाराष्ट्र शारदेच्या मंदिरात तेवत ठेवला. तो तेव्हापासून अजूनही अखंडपणे तेळाळत आहे आणि या पुढच्या काळातही तो तसाच प्रकाशमान होत राहणार आहे.

नवरात्रात नवे धान्य रुजविले जाते. महाराष्ट्राच्या भूमीत नवे विचार रुजणे गेल्या कित्येक शतकांपासून अखंडपणे सुरु आहे. अनेक साधुसंतांनी, तत्त्ववेत्यांनी आणि विचारवंतांनी या महाराष्ट्र शारदेच्या मंदिराच्या गाभार्‍यात विविध विचारसुगंधाची, विविध दृष्टिकोनांच्या रंगांची मनोहर लक्षावेधी शब्दसुमने गुंफलेल्या माळाही बांधल्या. नवरात्रोत्सवात प्रत्येक दिवशी एकेक माळ बांधली जाते. येथे असा हिशेब न मांडता सातत्याने अखंड माळा बांधल्या गेल्या.

श्रीमहाकाली, श्रीमहालक्ष्मी आणि श्रीमहासरस्वती या तिन्ही देवी त्रिगुणात्मिका मानल्या जात असल्या तरी महाकाली ही तामस गुणाची म्हणून विशेषकरुन ओळखली जाते. सत्त्व म्हणजे रज या दोन्ही गुणांबद्दल आपण विचार करु लागलो की, महालक्ष्मी ही राजस म्हणजे रजो गुणाची आणि सरस्वती ही सात्त्विक म्हणजे सत्त्व गुणाची मानली जावे असे स्वाभाविक वाटते. पण कित्येक शास्त्रकारांनी सरस्वतीला रजोगुणाची आणि लक्ष्मी सत्त्व गुणाची मानली आहे. महाकाली ही दुष्टदुर्जनांपासून संतसज्जनांचे रक्षण करते. भगवान श्रीकृष्णाप्रमाणे तिनेही दुष्टदुर्जनांचा नायनाट करण्यासाठी आपण पुन:पुन्हा अवतरु असे आश्वासन दिले आहे.

दुरितांचे तिमिर जावो। या हेतूने प्रत्यक्ष रणांगणावर मदोन्मत्त असुरदैत्यांना यमसदनी पाठविण्यास महाकाली निरंतर सिद्ध आणि तत्पर आहे. विश्व स्वधर्मसूर्य पाहो। असा सरस्वतीचा आग्रह आहे. स्वधर्म म्हणजे काय ? त्याचे पालन कसे करावे आणि स्वधर्माच्या सूर्याचा प्रकाश दाही दिशांत पसरण्यासाठी श्वेत पद्मासना, शुभ्र वस्त्रांकिता अशा सरस्वती अधिक योग्य नाही काय ? स्वधर्माचरण करण्यासाठी निष्ठेइतकीच विवेकाचीही आवश्यकता असते. विवेकबुद्धीला योग्य मार्गदर्शन सरस्वतीच्या कृपेशिवाय कसे मिळणार ? ज्ञान, बुद्धी, शिक्षण हे सर्व विषय सरस्वतीच्या अधिपत्याखाली नांदणारे. योग्य काय आणि अयोग्य काय, यांचे सम्यग् ज्ञान झाल्याशिवाय अखिल विश्व स्वधर्मसूर्याने उजळून कसे निघणार ? म्हणजे विश्व स्वधर्मसूर्ये पाहो। हे दायित्व ज्ञानाची देवता असलेल्या सरस्वतीलाच देणे अधिक योग्य होय आणि जो जें वांछिल तों तें लाहो । ज्याला जे हवे असेल, ते त्याला मिळावे, इच्छा असेल ते प्राप्त व्हावे, असे सामर्थ्य प्रदान करण्याची क्षमता देवी महालक्ष्मीवाचून दुसर्‍या कोणात आहे ? लक्ष्मीविना इहसौख्य सर्व भस्मतें असे कवींनी म्हटले आहेच.

दुष्टदुर्जनांचा नायनाट करुन जीवनाचा मार्ग निष्कंटक करणारी महाकाली, यमनियम पाळून तसेच स्वकर्तव्याचे भान ठेवून स्वत:बरोबर दुसर्‍याचाही विचार करुन जगावे कसे, त्याचे अचूक मार्गदर्शन करणारी महासरस्वती आणि ऐहिक वैभव तसेच सुखसमृद्धी देणारी महालक्ष्मी या तिन्ही देवता म्हणूनच परमवंद्य आहेत. नवरात्राच्या प्रारंभदिनी आपण या त्रिगुणात्मिका देवींच्या चरणी नतमस्तक होऊया.

ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर
'महान्यूज'मधील मजकूर.

कॉमन 'समृध्दी'

कॉमनवेल्थ गेम्स’मध्ये सहभागी झालेल्या ७१ लहान-मोठय़ा देशांना एकत्र आणणारा धागा आहे- इंग्रज वसाहतवादाचा वारसा.. ‘कॉमनवेल्थ’ चे समान सूत्र आहे, कला, क्रीडा, संस्कृती यांची ‘कॉमन’ समृद्धी.. ‘कॉमनवेल्थ’ या संकल्पनेला इतिहास आणि राजकारण यांचा पीळ आहे ..

Tuesday, October 5, 2010

आपल्याला माहित आहेत का बाबा आमटे ?

समाजाने दूर लोटलेल्या कुष्ठरोग्यांवर प्रेमाची पाखर घालणारे, त्यांच्यातला आत्मसन्मान जागवणारे, त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद जागवणारे बाबा म्हणजेच मुरलीधर देविदास आमटे.
बाबांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ साली वर्धा जिह्यातल्या हिंगणघाट या गावी झाला. बाबांचं घराणं सधन जाहगिदाराचं. त्यांचे वडील देविदास ब्रिटिश सरकारमध्ये अधिकारी होते. मुरलीधर आमटे यांना त्यांच्या लहानपणीच बाबा हे टोपणनाव मिळालं होतं.

बाबांनी कायद्याचं शिक्षण घेतलेलं होतं आणि वर्धा येथे त्यांनी वकिलीही केली. ते यशस्वी वकील म्हणून नावाजले होते. पण तिथे त्यांचं मन रमलं नाही. त्यांनी वकिली सोडून स्वातंत्र्य चळवळीत स्वत:ला झोकून दिलं. बेचाळीसच्या चलेजाव चळवळीत त्यांना कारावासाची शिक्षाही झाली महात्मा गांधींच्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात काही काळ वास्तव्य केल्यानंतर गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला. म. गांधींबरोबरच रविंद्रनाथ टागोर, विनोबा भावे आणि साने गुरुजी ही बाबांची श्रद्धास्थानं होती.

१९४६ साली त्यांचा साधना गुलेशास्त्रींशी विवाह झाला. साधनाताईं बाबांच्या सर्व सामाजिक कार्यांमध्ये खांद्याला खांदा लावून सहभागी झाल्या आणि आयुष्यभर त्यांना साथ दिली.

बाबा एकदा मुसळधार पावसात रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या कडेला भिजत, विव्हळत असहाय्यपणे पडलेल्या एका कुष्ठरोग्याला त्यांनी पाहिले आणि त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलला. बाबांनी स्वत:ला सामाजिक कार्यांत झोकून दिलं. महारोग्यांच्या पुनर्वसनासाठी आनंदवन हा आश्रम आणि अपंगांसाठी आणि समाजातल्या रंजल्या-गांजल्यांसाठी आणखी दोन आश्रम सुरू केले. पर्यावरण, वन्यप्राणी संरक्षण आणि नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतरही अनेक सामाजिक-पर्यावरणसंबंधित चळवळींमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं.

ज्या काळात त्यांनी महारोग्यांच्या पुनर्वसनाचं कार्य हाती घेतलं, त्या काळात महारोग हा महाभयंकर समजला जात होता. महारोग्यांना कुणी जवळ करीत नसे. त्यामुळे त्यांच्या नशिबी अस्पृश्यांसारखे जिणे येत असे. असहाय्य रोगाने गांजलेले हे रोगी त्यामुळे मानसिकरित्याही खचून जात असत. समाजात त्यांना वावरताही येत नसे. त्या काळात असाही गैरसमज होता की महारोग हा संसर्गजन्य असतो. जनमानसातला हा गैरसमज दूर करण्यासाठी बाबांनी एका महारोग्याचे जंतू आपल्या नसांत इंजेक्शनने टोचून घेतले.

आज आनंदवनात एक सुसज्ज हॉस्पिटल आहे, शाळा आहे आणि अनाथाश्रमही आहे. आनंदवनात पाच हजारांपेक्षाही जास्त लोक वास्तव्याला आहेत. `आनंदवन'चा प्रकल्प जगातील एक मान्यताप्राप्त प्रकल्प आहे.

समाजकार्याबरोबरच मोजकंच पण अतिशय सशक्त लेखनही त्यांनी केलं. `ज्वाला आणि फुले' हा त्यांचा कवितासंग्रह अनेक तरुणांना प्रेरणा देऊन गेला. `उज्ज्वल उद्यासाठी' हा काव्य संग्रह आणि `माती जागवील त्याला मत' ही त्यांची पुस्तकंही गाजली.

बाबांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आलं. कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणार्‍यांसाठी दिला जाणारा सर्वोƒ पुरस्कार म्हणजे अमेरिकेचा डेमियन डट्टन पुरस्कार. हा पुरस्कार त्यांना त्यांना १९८३ प्रदान करण्यात आला, १९८५ साली आशियाचं नोबेल पारितोषिक समजले जाणारे रेमॉन मॅगसेसे पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं आणि `संयुक्त राष्ट्र'ने १९९१ आणि १९९८ साली त्यांचा सन्मान केला. याही व्यतिरिक्त त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. भारत सरकारने १९७१ साली पद्मश्री आणि १९८६ साली पद्मविभूषण देऊन त्यांना सन्मानीत केलं. महाराष्ट्र सरकारचा सावित्री बाई फुले पुरस्कार त्यांना १९९८ साली देण्यात आला आणि २००४ साली त्यांना `महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आलं.

गेली काही वर्षं त्यांना शारीरिक व्याधीमुळे बसता येत नव्हतं, त्यांना सतत झोपून राहावं लागायचं. पण तरीही त्यांच्या कार्यांमध्ये कोठेही खंड पडला नाही. २००७ साली त्यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि अखेर ९ फेब्रुवारी २००८ साली वयाच्या ९३व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

त्यांची दोन्ही मुलं विकास आणि प्रकाश आणि सुना मंदाकिनी आणि भारती हे सर्व डॉक्टर आहेत आणि वडिलांचा समाजकार्याचा वारसा समर्थपणे सांभाळीत आहेत. त्यांच्या नातवंडांची तिसरी पिढीही आता समाजकार्यासाठी सज्ज आहे.

  • शुभांगी मांडे

    'महान्यूज'मधील मजकूर.
  • Saturday, September 25, 2010

    अनुभव आणि व्यवहार याची सांगड घातल्याशिवाय कोणतीही विद्या पूर्ण होत नाही.

    अनुभव आणि व्यवहार याची सांगड घातल्याशिवाय कोणतीही विद्या पूर्ण होत नाही.
           - असे म्हटले आहे न. वी. गाडगीळ यांनी. आणि हे अगदी खरेच आहे. एखादी पदवी घेतली म्हणजे आपण काही तज्ञ होत नाही. त्यासाठी अनुभवाचे धडे घ्यावे लागतात.

    युथफूल महासंस्कृती : भाग-४

    युथफूल महासंस्कृती : भाग-४

    Friday, September 24, 2010

    महाभारता मधील व्यवस्थापन शास्त्र. Management Skills From Mahabharta.

    महाभारताची कथा प्रचंड गुंतागुंतीची आहे. या महाकाव्यातील प्रत्येक पात्राला अंतत: दु:खं आणि नुकसान सोसावे लागते. १८ दिवसांच्या भीषण महायुद्धानंतर खरा विजय कोणाच्याच हाती लागला नाही. कुरुवंश जवळजवळ संपल्यात जमा झाला. एकसमयावच्छेदे करून, महाभारतकार असेही सांगतात, की तरीही जीवन जगायलाच हवे, वर्तमानाला धैर्याने सामोरे जायलाच हवे. नीती, तत्त्व, दुराभिमान, तडजोड, इत्यादींपासून सुटका नाही. निवड करणं महाकठीण असतं. तरीही निवड करायलाच हवी. जीवनाकडे बघण्याचा हा अस्तित्ववादी दृष्टिकोन आहे. सार्थनी म्हटल्याप्रमाणे मॅन इज कंडेम्ड टू बी फ्री, अ‍ॅण्ड फ्रीडम नेसेसरिली मिन्स मेकिंग चॉइस. अ‍ॅण्ड दि चॉइस इज टू बी मेड इन द प्रेझेण्ट. चित्र पूर्ण नसले किंवा निष्पत्ती स्पष्ट नसली तरी निर्णय घ्यावेच लागतात. म्हणूनच व्यवस्थापकांसाठी महाभारत एक उपयुक्त आणि अमूल्य ठेवा आहे.
    आता आपण महाभारतातील दोन प्रसंगांकडे वळू या. युद्ध अटळ आहे. असे ठरल्यावर कौरव आणि पांडव या दोघांनी सेनापतींची निवड कशी केली? दुर्योधनाने आपल्या अधिकारात भीष्म यांची नेमणूक केली आणि मतभेद उफाळून आले. कर्ण म्हणाला, जोवर भीष्म सेनापती असतील तोवर मी युद्धा भाग घेणार नाही. युद्धिष्ठिराने मात्र श्रीकृष्णाचा सल्ला घेण्याचे ठरविले. सर्व जण एकत्रित जमले. श्रीकृष्णाने प्रथम ही चर्चा केली, की सेनापतीमध्ये कोणते गुण पाहिजे. त्याची बलस्थानं पाहिली पाहिजेत. त्यावर आधारून एक प्राथमिक यादी तयार करण्यात आली. प्रत्येक नावाबद्दल चर्चा झाली. शेवटी दोनच नावं उरली. एक अर्जुन आणि दुसरा धृष्टदन्मुम्न- द्रौपदीचा भाऊ. श्रीकृष्णाने कारणासहित आपली पसंती धृष्टदन्मुम्नसाठी सांगितली एका प्रकारे स्वॉट (रहडळ) अ‍ॅनालिसिस करण्यात आले. श्रीकृष्णाने ‘कन्सलटेटिव्ह प्रोसेस’ आणि ‘इनक्लुझिव्ह मेथड’ यांचा उपयोग निर्णय घेण्यासाठी केला. या निर्णयाला साहजिकच सर्वतोमुखी पाठिंबा मिळाला. दुसरा प्रसंग आहे, मद्र देशाचा राजा शल्य (नकुल आणि सहदेवचा मामा) दुर्योधनाच्या बाजूला जाण्याचा. तो पांडवांच्या बाजूने लढण्यासाठी मद्र देशातून हस्तिनापुरास येण्यासाठी निघाला. वाटेत दुर्योधनातर्फे त्याची इतकी खातिरदारी करण्यात आली, की पाहुणचाराची परतफेड म्हणून तो कौरवांच्या बाजूला गेला. याच ग्रंथात, श्रीकृष्णाने अर्जुनाला (वाचा, व्यवस्थापकांना) दिलेल्या जगप्रसिद्ध सल्ला आहे. कर्मावर लक्ष केंद्रित कर, निष्पत्तीवर नको. लेखकांना खात्रीपूर्वक असं वाटतं, की व्यवस्थापकांना साहित्यातून मार्गदर्शन मिळू शकतं.

    लोकसत्ता मधून साकार.

    धर्माच भांडण धर्माशी नसतं, अधर्माशी असतं.

    धर्माच भांडण धर्माशी नसतं, अधर्माशी असतं.
    निरनिराळे धर्म म्हणजे पूर्णत्वाकडे जाणारे वेगवेगळे मार्ग आहेत. सर्व नद्या ज्याप्रमाणे समुद्रला मिळतात त्याप्रमाणे सर्व धर्म ईश्वराकडे येतात. तेंवा धर्माच झगडा धर्माशी असूच शकत नाही. ते अज्ञानाच लक्षण आहे. धर्माच भांडण अधर्म व अनीती बरोबर असत.

    Thursday, September 23, 2010

    युथफूल महासंस्कृती-३ : सांस्कृतिक शिक्षणाचा बहुआयामी समन्वय

    युथफूल महासंस्कृती-३ : सांस्कृतिक शिक्षणाचा बहुआयामी समन्वय गेल्या ५० वर्षांत भाषिक आणि एकूण सामाजिक परिस्थितीत घडलेले बदल, तसेच माहिती तंत्रज्ञानामुळे विकसित झालेली संपर्कसाधने इत्यादी बाबी लक्षात घेऊन मराठी भाषेसाठी वापरल्या जाणाऱ्या देवनागरी लिपीच्या लेखनपद्धतीमध्ये काही बदल करणे ही काळाची गरज बनली आहे. हा बदल करताना पूर्वापार मराठी लेखनपद्धतीमधील काळानुरूप स्वीकारार्ह भाग कायम ठेवून मराठी भाषा व्यवहारोपयोगी आणि अधिक समृद्ध करण्याकरिता लेखनपद्धतीचे नियम अधिक तर्कसंगत आणि लवचिक करण्यात येतील. लेखनपद्धतीच्या संदर्भात जुन्या विचारांचे योग्य भान ठेवून नवीन प्रवाहाचे स्वागत करणारे अभ्यासक/ तज्ज्ञ यांच्या अभ्यासगटांमार्फत लेखनपद्धतीचे नवे नियम ठरविण्यात येतील, तसेच मराठीतील विशिष्ट शब्द, वाक्यप्रयोग इत्यादीचा वापर करण्याच्या बाबतीतही पुनíवचार केला जाईल.

    प्राचीन लेखन साहित्य

    प्राचीन लेखन साहित्य आदी मानवाने हळूहळू प्रगती करून भाषा बनवली. मग लिपी विकसित झाली. पुढे मानव लिहू लागला. पण या सर्व सुधारणा व प्रगती अगदी संथ गतीने व गरजेपोटी होत गेल्या, ज्यात हजारो वर्षे खर्ची पडली. आज आपण प्रगत मानव म्हणून अभिमानाने जगतो, पण त्या मागे मानवाची जिद्द व तपश्चर्या फारच मोठी आहे. जुना मानव लिहीत कशा प्रकारे होता? त्याची साधने काय होती हे कुतूहल आपल्या सर्वानाच आहे.

    बाय बाय बाप्पा !

    बाय बाय बाप्पा !

    Wednesday, September 22, 2010

    आपल्याला माहित आहे का सगळ्या बाँबांचा बाप हा जगातील सगळ्यात मोठा विस्फोटक बाँब आहे ?

    एव्हियेशन थर्मोबेरिक बॉम्ब ऑफ इन्क्रिझ्ड पॉवर ऊर्फ सगळ्या बाँबांचा बाप (रशियन: Авиационная вакуумная бомба повышенной мощности (АВБПМ) ) हा रशियात तयार होणारा हवेतून टाकण्यात येणारा व जमिनीवर फुटणारा बाँब आहे.
    अमेरिकन सैन्याने तयार केलेल्या मासिव्ह ऑर्डनन्स एर ब्लास्ट बाँब (MOAB) या बाँबापेक्षा याची विस्फोटक्षमता चौपट आहे. अमेरिकन बाँब मदर ऑफ ऑल बाँब्स या नावाने ओळखला जात असल्यामुळे या बाँबाला सगळ्या बाँबांचा बाप असे उपनाव देण्यात आले आहे.

    ह्या हवाबंद कुपीतून तयार होणारी उर्जा ४४ टन टीएनटी इतकी आहे. ही उर्जा बनवण्यासाठी ७.८ टन नवीन प्रकारच्या उच्च विस्फोटकाची गरज असते. हे विस्फोटक नॅनो तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनवले आहे. ११ सप्टेंबर २००७ रोजी ह्या बाँबची यशस्वी चाचणी घेण्यात आली.


    परिमाणमासिव्ह ऑर्डनन्स एर ब्लास्ट बाँबएव्हियेशन थर्मोबेरिक बाँब ऑफ इन्क्रिझ्ड पॉवर
    वजन:८,२०० किलो.७,१०० किलो.
    टीएनटी विस्फोटक्षमता:११ tons / २०,००० Ib~४४ tons / ८०,००० Ib
    स्फ़ोट त्रिज्या :१५० मी. (५०० फूट)३०० मी. (१,००० फूट)
    दिग्दर्शन:INS/GPSUnknown

    Friday, September 17, 2010

    शमी मंदार

    गणपतीला जशा दूर्वा प्रिय तशीच शमी-मंदारही प्रिय असल्याचे सर्वांना माहित आहेच. शमीचे झाड हे उंच वाढते. त्याच्या सर्वांगाला काटे असतात. हे काटे म्हणजे अर्जुनाचे बाण असेही मानले जाते. कारण पांडवांनी अज्ञातवासात जातांना आपली शस्त्रे शमीवृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवली होती, अशी कथा महाभारतात आहे. त्यातील अर्जुनाच्या बाणांचे प्रतीक म्हणजे हे काटे असावेत.

    शमीची पाने ही दुष्कृत्ये आणि दु:स्वप्ननाशक मानली जातात, तशीच ती मंगलदायकही समजतात. म्हणूनच दसर्‍याला शमीवृक्षाची पूजा करुन सीमोल्लंघन केले जाते. अशी ही शमी आणि तिच्या जोडीला मंदार या दोन्ही वृक्षांची पाने गणपतीला प्रिय का वाटू लागली ?त्याचीही एक कथा आहे.

    ही कथा नारदऋषींनी इंद्राला सांगितली होती. वीतिहोत्र नगरीत औरव नावाचा महाविद्वान ब्राम्हण आपल्या परमधार्मिक वृत्तीच्या सुमेधा नामक पत्नीसह सुखाने संसार करीत होता. शमीका ही त्यांची मुलगी अतिशय सुंदर, गुणी होती. तिच्यावर त्या दोघांचे निरतिशय प्रेम होते. ती लहान असतानाच धौम्यऋषींच्या बुद्धिमान आणि श्रद्धाळू अशा मंदार नावाच्या मुलाबरोबर तिचा विवाह झाला. त्या दोघांचा संसारही अतिशय सुखासमाधानात चालला होता. एकदा काही कामानिमित्त जात असताना भ्रुशुंडीऋषी वाटेतच असणार्‍या मंदारच्या आश्रमात आले. भ्रुशुंडींना दोन भुवयांमध्ये सोंड तर होतीच, पण ते अंगाने चांगलेच स्थूलदेखील होते. त्यांचे ते रुप आणि तो स्थूल देह पाहून न राहावून मंदार आणि शमी हसू लागली. हे दाम्पत्य आपल्याला हसताना पाहून भ्रुंशुंडी रागावले. त्यांनी त्या रागाच्या भरात शमी-मंदारला तुम्ही दोघे वृक्ष व्हाल, तुम्हाला भरपूर काटे असतील. त्यामुळे एकही पक्षी तुमच्या आश्रयाला कधी येणार नाही, असा शाप दिला. त्क्षणी शमी-मंदार झाडे बनली. असा एक महिना गेला. आपल्या प्रिय शिष्याचे काहीच कुशल वर्तमान न समजल्याने मंदारचे गुरु शौनकऋषी हे औरवाच्या घरी आले. पण त्यांनाही त्या दोघांबद्दल काही ठाऊक नव्हते. तेव्हा शौनक ध्यानस्थ बसले. त्यांनी अंतर्ज्ञानाने भ्रुशंडीच्या शापाने त्या दोघांचे वृक्ष झाल्याचे जाणले. त्या दोघांची शापातून मुक्तता व्हावी म्हणून शौनक आणि औरव या दोघांनी बारा वर्षे गणेशाची आराधना केली. त्यांच्या आराधनेने प्रसन्न होऊन गणपतीने त्यांना दर्शन दिले. मात्र भ्रुशुंडी या आपल्या परमभक्ताचा शाप खोटा ठरु शकणार नाही, असे सांगून त्यामधून एक मार्ग दाखविला. तो म्हणजे त्या दिवसापासून आपण स्वत: मंदार वृक्षाच्या मुळाखाली वास्तव्य करु, तसेच शमीपत्रे आपल्याला प्रिय होतील. त्यामुळे जो कोणी आपल्या मूर्तीची स्थापना मंदार वृक्षाखाली करुन त्यावर शमीपत्रे आणि दूर्वा वाहून आपली पूजा करील त्याचे मनोरथ पूर्ण होतील. इतकेच नव्हे तर मंदार वृक्ष, शमीपत्र आणि दूर्वा या तिघांचे मिलन हा एक महायोग समजला जाईल, असे सांगितले. त्या दिवसापासून गणेशपूजनात शमी-मंदार-दूर्वा यांना अनन्य स्थान प्राप्त झाले.

    शमीवर गजाननाचे असलेले प्रेम दुसर्‍या एका कथेतून प्रत्यक्ष भगवान महादेवांनी पार्वतीला सांगितले आहे. अतिशय कीर्तिवान आणि महाप्रतापी अशी प्रियव्रत राजाची एक पत्नी कीर्ती ही पतीची नावडती होती. तिला जेव्हा छळ असह्य झाला, तेव्हा ती प्राणत्याग करण्यास सिद्ध झाली. त्या वेळी तिच्या देवल नावाच्या पुरोहिताने तिला त्यापासून परावृत्त करुन गणेशोपासना करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने मंदार वृक्षाच्या वाळलेल्या लाकडापासून गणपतीची मूर्ती करवून घेऊन गणपतीच्या पूजेला प्रारंभ केला. एक दिवस बरेच शोधूनही दूर्वा न मिळाल्याने तिने हाती लागलेल्या शमीपत्रांनीच गणपतीची पूजा केली. त्याने प्रसन्न होऊन गणपतीने तिला आशीर्वाद दिला. त्यानंतर तिचे दुदैवाचे दिवस संपले. ती राजाची प्रिय पत्नी बनली. तिला झालेला क्षिप्रप्रसादन हा मुलगा पुढे गणपतीचा परमभक्त म्हणून प्रसिद्ध झाला.

    ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर
    'महान्यूज'मधील मजकूर.

    Tuesday, September 14, 2010

    अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा.

    अभ्यासाचा  कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा.
    अर्थ : अभ्यास म्हणजे सहजपणे एखादी शिकवण वारंवार उजळणे, अशा डोळस उजळनितून  चांगल्या गोष्टींचा जन्म होतो. अभ्यासाशिवाय भाग्यादय होणे अशक्यच आहे. अभ्यास हि उत्कर्षाची गुरुकिल्ली आहे.        

    Monday, September 13, 2010

    गणपति बाप्पा तूच सुखकर्ता आहेस.


    गणरायाचे आगमन झालेले आहे. टाळ, झांजा, पखवाज, ढोल, ताशा अशा विविध वाद्यांच्या गजरात गणरायाची गाणी आणि आरत्या सुरू झालेल्या आहेत. विद्येसोबत गणरायही कलेची आराध्यदेवता आहे. लोकनायक, गणनायक गणेश नृत्य करीत असल्याचा उल्लेख विविध ग्रंथांमध्ये आढळतात. संत तुकाराम महाराजांनीही गणपतीवर केलेल्या अभंगात म्हटले आहे.

                                                                    'नाचत आले हो गणपती
    पायी घागु-या वाजती'

    'गणराया लवकर येई भेटी सकळांशी देई' या अभंगात संत तुकारामांनी गणपतीच्या रूपाचे वर्णन केले आहे व पुढे 'विठ्ठल गणपती दुजा नाही' असे म्हटले आहे. गणपती हा नाचत येतो असे तुकारामांनी म्हटले आहे. यावरूनच गणपतीचे लोकरंगनायक, नर्तक हे रूप स्पष्ट होते. भेदिकाद्वारे आध्यात्मिक कुटे सादर करणारे कलगीपक्ष आणि तुरापक्षाचे शाहीर गणाच्या उत्पत्तीसंबंधीही परस्परांना कूट प्रश्न विचारीत असत हे पठ्ठे बापूराव आणि भाऊ फक्कड यांच्या गणांवरून स्पष्ट होते. 'गणपती नाचून गेल्यावरती शेंदूर वाहू यक्षिणीप्रती' असे उत्तर दुसर्या एका गणातून भाऊ फक्कड यांनी दिले आहे. गणपती ही यक्षकुळातील देवता असल्याचे भाऊ फक्कड यांना ज्ञात होते. यावरून कलगी-तुर्याच्या या रचनाकारांची व्युत्पन्नता ध्यानी येते. गणांची निर्मिती करताना या गणाद्वारे परस्परांना आव्हान देण्याचा गानप्रकार म्हणूनही या रचनाकारांनी गणांचे उपयोजन केले. पठ्ठे बापूरावांचा हा गण पहा-

    लवकर यावे सिध्द गणेशा
    आतमधी कीर्तन वरूनी तमाशा
    माझा भरवसा तुम्हावरी खासा
    विघ्न पिटविशी दाही दिशा
    झेंडा मिरवशी आकाश पाताळी
    वैरी करिती खाली मिशा
    पठ्ठे बापूराव कवीच्या कवनी
    बाजारबुणग्यांचा झाला हशा

    पठ्ठे बापूराव हे कलगीपक्षाचे शाहीर होते. त्यांनी या गणातून तुरेवाल्या शाहिरांना भेदिकाच्या लढतीत नामुष्की पत्करावी लागेल असा हल्ला चढविला आहे. 'वैरी करिती खाली मिशा' ही ओळ त्याचेच द्योतक आहे. तुर्रेवाल्यांना 'बाजारबुणगे` असे संबोधून त्यांचा हशा झाला असल्याची प्रतिक्रिया पठ्ठे बापूरावांनी नोंदविली आहे. अषा रितीने गणांच्या निर्मितीतही कलगी-तुरा संघर्षाचे नाटयमय सूचन झालेले आहे. जागरणासारख्या विधिनाटयांमधून अशा स्वरूपाचे गण सादर होतात, पण भेदिकाच्या लढतीचे स्वरूप तेथे नसते. तर गणपतीचे संकीर्तन एवढाच मर्यादित हेतू असतो.
    गणांतील गणपती हा कधी बालरूपात, कधी विद्येचा अधिपती, कधी सकळ कलांचा अधिपती, कधी विघ्नविनाशक अशा स्वरूपांत येतो. या गौरीनंदन अशा गणपतीचे शंकरराव जाधव-धामणीकर यांनी शब्दबध्द केलेले रूप् पाहा-

    आज वंदन करितो, गौरी नंदना
    नवविध विद्या करितो भक्ती
    भक्तासी द्यावी मुक्ती
    हीच आमुची सर्व शक्ती लावितो पणा।।१।।
    चौदा विद्येचा गणपती । चौसष्ट कला तुझे हाती
    बालकासी द्यावी स्फूर्ती । गावया गुणा ।।२।।
    नमो तुज सरस्वती । ब्रम्हा वीणा घेऊन होती ।
    स्वर गायनाने डुलती सभा रंगणा
    शाहीर शंकर करी गर्जना । रक्षी रक्षी भक्ता जना ।
    बबन नामदेव दावा । अंतरी खुणा

    गौरीच्या नंदनाची आराधना करताना भक्तही बालक होतात व 'बालकासी द्यावी स्फूर्ती` असे आशीर्वचन मागतात.
    गणपती 'विघ्नहार्ता' असल्याने तो रणात निश्चित तारून नेईल अशी श्रध्दा गणाद्वारे व्यक्त केली जाते. गणपतीचे योध्दा म्हणून असलेले रूप् मार्तंड भैरव व मणिमल्ल दैत्यांच्या युध्दात आपण आधी पाहिले आहेच. उल्कामुख दैत्याचा वध करणारा गणपती रणात रक्षण करील या श्रध्देपोटी शंकरराव जाधव-धामणीकर यांनी रचलेल्या गणातील हे वर्णन पहा.-

    या गणा या या रणा या । विघ्न हारा या तुरा या ।।धृ।।
    तुझ्याच स्मरणी जग हे तरले । अखंड व्यापुनी त्रिखंड उरले ।
    दुखंड मनाला कधी न पुरले । पाखंड मनाला माराया ।।१।।
    काम, क्रोध अनिवार । होतो मजवर मारा फार ।
    पडेल कार्याचा हा भार । जडल रोग तो बाराया ।।२।।
    ऋध्दी-सिध्दीचा तू सागर । दु:ख क्लेश हाराय ।
    विकल्पबुध्दीचा हा घोर । ज्ञान अमृत पाजावा ।।३।।
    कवि शंकर म्हणे कृपासिंधु । दीननाथा दीन बंधू ।
    वारंवार तुजशी वंदू । दु:ख क्लेश हाराया ।।४।।

    गणांच्या सादरीकरणामागे जे आशयसूत्र दिसते ते असे-

    १) कार्यारंभी गणाचे वंदन आशीर्वचन प्राप्तीसाठी करावे.
    २) गणेश ही सकल कलांची देवता आहे. कलेच्या प्रारंभीच या देवतेकडून रंगउर्जा घ्यावी.
    ३) अरिष्टांचे निवारण व्हावे म्हणून गणपतीचा धावा करावा. ही अरिष्टे दोन प्रकारची असतात. भौतिक पातळीवरची आणि आधिभौतिक पातळीवरची. भौतिक अरिष्टे म्हणजे आर्थिक आपत्ती, रोगराई इत्यादी व आधिभौतिक आरिष्टे म्हणजे काम, क्रोध आदी शड्रिपूंपासून अभय प्राप्त व्हावे म्हणून गण सादर करणे.
    ४) गणातून 'गणा'शी आणि 'गणां'शी संवाद. गण म्हणजे व्यक्तींचा समूह. या समूहाशी संवाद साधण्याचा आरंभ गणाद्वारे व प्रत्यक्ष गणपतीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असतो. अनेक गणांमध्ये सादरकर्ता, म्हणजेच उपासक येथे गणपतीशी संवाद साधतोय व आशीर्वचन मिळतेय हे आशयसूत्र असते.

    गोधळ, जागरण, तमाशा आदी लोककला प्रकारांत संकीर्तन स्वरूपातील 'गण` दशावतार, लळीत यासारख्या भक्तिनाटयात प्रत्यक्ष स्वरूपात अवतरतो. हा गणेश 'नृत्यगणेश' होय.

    प्रा.डॉ. प्रकाश खांडगे
    महान्यूज'मधील मजकूर.

    शब्दात भाव असेल तर शब्दांना भाव मिळेल.

    शब्दात भाव असेल तर शब्दांना भाव मिळेल.
    अर्थ : उपदेशामागे  अनुरूप आचारनाची तपश्चर्या असेल, त्यातील शब्धानमागे अत्मनिष्ठेचे पाठबळ  असेल तर त्या शब्धाना मंत्र अक्षरांचे  सामर्थ्य येते. शब्ध केवळ ओठा तुन  न येता रुदयातुन आले पाहिजेत.  

    Sunday, September 12, 2010

    अपल्यामधिल एकही दोष लक्षात न येने, हाच सर्वात मोठा दोष आहे.

    अपल्यामधिल एकही दोष लक्षात न येने, हाच सर्वात मोठा दोष आहे.
    अर्थ : मानुस अपुरा असतो. तो परिपूर्ण नाही हेच सत्य आहे. प्रत्येकाचे कोनतेतरी  दोषस्थान असतेच. हे ज्याला जाणवत नाही, तोच त्याचा मोठा दोष, अपुरेपना ठरतो.

    Saturday, September 11, 2010

    अहंकार ही माणसाची कुबड़ी असते.

    अहंकार ही माणसाची कुबड़ी असते.
    अर्थ : ज्याला काहीही  माहिती नाही मोठेपणा नाही तो मानुस आपल्याला जगाने मोठे म्हणावे यासाठी खोट्या अहंकराला फुलवतो. अहंकार अद्न्यानातुन  निर्माण होतो व तो माणसाला पंगु बनवतो. 

    गणेशोत्सवाची धूम आजपासून सुरु.

    कोणत्याही शुभकर्यच्या प्रसंगी अग्रपुजेचा मान गणपतीला असतो. गणेशाचे सुखकर्ता- दुखहर्ता असे स्वरुप आहे. त्याची अनेक नवे आहेत. त्यापैकी गणपति हे रूढ़ आणि प्रचलित नव आहे.  आशा गणपतीचा किंवा गणेशाचा उत्सव भाद्रपद शुक्ल चतुर्थिपासुंन  अनंतचतुर्दशीपर्यंत असतो. त्यालाच आपन गणेशोत्सव म्हणतो.

    आज प्रात:काळापासून हे ओथंबणार्‍या उत्साहाचे प्रसन्न वातावरण का बरे आहे? आज प्रत्येक मराठी घरात, मग ते घर मराठीच्या माहेरी महाराष्ट्रात असो वा सातासमुद्रापलीकडे कुठल्या विदेशात असो, एका अबोध आनंदाचा सुगंध का बरे दरवळत आहे ? दिवस पावसाचे असल्यामुळे पाण्याचा पूर येणे समजू शकते. पण हा उत्साहाचा महापूर कशाचे द्योतक आहे ? सूर्य जसजसा वर येत आहे तसतसा वाढणारा हा आनंद, हा उत्साह, हा उत्साह, हा जल्लोष, कशाचा आहे ?


    अरे, कशाचा आहे म्हणून काय विचारता ? गेली हजारो वर्षे आजच्या दिवशी पूर्वेच्या उंबरठय़ावर पाऊल टाकणारा तेजोभास्कर आनंदाची लयलूट करीत येतो. गेली शेकडो वर्षे हा दिवस महाराष्ट्राच्या नाक्यानाक्यावर, गल्लीगल्लीवर उत्साहाचा गुलाल सहस्त्रहस्तांनी दाही दिशांना उधळत येतो.

    हा दिवसच तसा महत्त्वाचा आहे. आपल्या कुठल्याही मंगलकार्याचा प्रारंभ मग तो शिक्षणाचा शुभारंभ असो, विवाहासारख्या मंगलकार्याचा प्रारंभ असो, धार्मिक, सामाजिक कुठलेही काम असो, ज्याला सर्वप्रथम वंदन केले जाते, ज्याचे सर्वप्रथम स्मरण केले जाते त्या गणेश, गजानन, गणपतीचा आज जन्मदिवस आहे.

    हा गणपती विविध अवतार घेऊन या भारतवर्षात अवतरला दुष्टदुर्जनांनी साधुसंतांना सळो की पळो करुन सोडले, निरपराध जनता त्रस्त, भयग्रस्त झाली त्या त्या वेळी व त्या त्या युगाला साजतील अशी आयुधे घेऊन हा प्रतिकूलतेशी लढा देण्यास सिद्ध झाला. ह्याने जिथे म्हणून छळवणूक असेल तिथे तिथे याची दमदार पावले विरोधकांचा नायनाट करण्यासाठी सतत अग्रभागी वावरली.

    युध्द नसेल त्या वेळी लोकांच्या अंगातील गुण हेरुन त्यांना उत्तेजन देण्याचे कार्य ह्या गुणवंत गणेशाने केले. हा खाण्यात रंगला, हा कलारंगात दंग झाला, हा युद्धात विजयी झाला, हा संसारात समरस झाला. पराक्रम करावा आणि पराक्रम करुन मिळविलेले ऐश्वर्य, वैभव सत्कृत्यांना उत्तेजन देण्यात कामी आणावे, असाच जणू ह्याचा रिवाज. हा गोरगरिबांचा कनवाळू, आपल्या खर्‍या भक्तांवर, आपल्याला मदत करणार्‍या सैन्यातील सैनिकांवर ह्याची नेहमी कृपादृष्टी कपट-कारस्थानी दुष्टांशी लढताना ह्याने त्यांच्याच मार्गाने त्यांना पराभूत केले. उदंड यशप्राप्ती झाल्यानंतर एका विजयोत्सवी मिरवणुकीत ह्याला एका कोपर्‍यात उभा असलेला शुक्ल नावाचा भक्त दिसला. इतर सर्व थोरामाठय़ांकडील आदरसत्कार नाकारुन हा त्या गरीब, सद्भावी अंत:करणाच्या भक्ताच्या घरी जाऊन पेज जेवला.

    अवघड काळात माणसाने पुडील पिढय़ांसमोर ठेवला. आजही हा सद्भावपूर्ण अंत:करणाने भक्ती करणार्‍यांना पावतो. ते बाजूला असले, कोपर्‍यात असले तरी ह्याचे त्यांच्याकडे नेमके लक्ष असते. अशा ह्याचा जन्मोत्सव पिढय़ान्पिढय़ा, शतकानुशतके अत्यानंदाच्या वर्षावात न्हाऊन साजरा केला जाऊ लागला.

    ह्याचा जन्म म्हणजे दुराचारांचा अंत, ह्याचा जन्म म्हणजे नवयुगाची प्रभात, याचा जन्म म्हणजे अंधकारात सापडलेल्यांना प्रकाशाचे किरण. तो जन्म ज्या तिथीला झाला ती ही आजची तिथी. मग ती उत्साहात न्हाऊन निघाली तर काय आश्चर्य ?

    • ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर
    • From Mahanews.

    Friday, September 10, 2010

    मदतीचा हात तुमच्या मनगट| जवळ असतो. Suvichar.

    मदतीचा हात तुमच्या मनगट| जवळ  असतो.
    अर्थ : यशस्वी होण्यासाठी जे सामर्थ्य लागते ते अपल्यातच असते. देवावर, दैवावर अथवा दुसरयावर अवलंबून न रहता जो स्वतावर अवलंबून राहतो तोच पराक्रम करतो. जो दुसरयावर विसंबतो त्याचा कार्यभाग बुडतो. आत्मनिर्भर होवून स्वताच स्वताचा विकास घडवून अनावा.

    रमजान ईद उत्साहात साजरा / ramjan ed.

    रमजान महिन्यातील उपवासाच्या व्रताची संगता करण्याचा सन म्हणजे रमजान ईद. रमजान हा मुस्लिम वर्षातील नववा महिना. हा महिना पवित्र मनाला जातो. या महिन्यात मुस्लिम बांधव सम्पूर्ण पाने उपवास करतात. त्याला 'रोजा' म्हणतात. रोजा केल्याने पापक्षालन होते आणि  स्वर्गप्राप्ति होते असे मानले जाते.

    Mahakrushi: बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Fes...

    Mahakrushi: बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Fes...: "बैल पोळा हा असा सन आहे, की या दिवशी शेतकरी आपल्या साठी काम करणारे जे बैल आहेत त्याच्याविषयी कृत्द्न्यता व्यक्त करतो. त्यांचे पूजन करतो त्याच..."