महासंस्कृती
Power To You.
Saturday, October 30, 2010
एका वैचारिक क्रांतीचा प्रवास : नैसर्गिक धर्मशास्त्र ते नैसर्गिक निवड
चार्ल्स डार्विन यांच्या १९ व्या शतकातील उत्क्रांतीविषयक सिद्धांतांनी सर्व प्रस्थापित विचारांना आणि सत्ताधारी वर्गानाही प्रचंड धक्का दिला. या सत्ताधारी वर्गात सर्वात प्रमुख प्रवाह होता तो धर्मपीठांचा. विज्ञानविश्वात तोपर्यंत फिजिक्स झपाटय़ाने प्रगत होत होते. परंतु जीवसृष्टीचा अभ्यास करून उत्क्रांतीविषयक सिद्धांताने फिजिक्सने आखून दिलेल्या सीमाही ओलांडल्या. तेव्हापासून आयझ्ॉक न्यूटननंतर चार्ल्स डार्विन यांचे नाव क्रांतिकारक वैज्ञानिक म्हणून घेतले जाऊ लागले. डार्विन यांचे एक स्वतंत्र आणि समांतर विचारपीठच निर्माण झाले. जवळजवळ शंभर वर्षे या डार्विन पीठाचा दबदबा इतक्या प्रचंड प्रमाणात होता की त्याला आव्हान देणारे प्रतिगामी व सनातनी म्हणून संबोधले गेले. परंतु गेल्या काही वर्षांत विश्वाच्या उत्पत्तीविषयी, जीवसृष्टीच्या निर्मितीविषयी आणि उत्क्रांतीविषयी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात नवे सिद्धांत निर्माण होऊ लागले. या पाश्र्वभूमीवर माजी खासदार प्रदीप रावत यांनी भाषांतरित केलेला कॅलिफोर्निया विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ इकॉलॉजी अॅण्ड इव्होल्यूशनरी बायॉलॉजीचे प्रा. फ्रान्सिस्को जे. आयला यांच्या विवेचनाचा हा स्वैर अनुवाद...
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment